
गोरखपूर-मुंबई अवध एक्स्प्रेसमधून 13 कोटी 83 लाखांचे चरस वांद्रे रेल्वे पोलिसांनी जप्त केले होते. याप्रकरणी एकाला वांद्रे रेल्वे पोलिसांनी अटक केली. मुन्ना नूर अन्सारी असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फेब्रुवारी महिन्यात 21 तारखेला ही घटना उघडकीस आली होती. श्वान पथक आणि फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या बॅगेची तपासणी केली. त्यात 31 पॅकेटस् होती. त्या पॅकेटस्मध्ये उच्च प्रतीचे चरस होते.
तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मुन्नाला ताब्यात घेऊन अटक केली. मुन्ना हा जेलमधून अमली पदार्थाचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.





















































