वेंगुर्ल्यातील बेपत्ता संतोष गावडेचा मृतदेह आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सिंधुदुर्ग
वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली – गावडेवाडी येथील बेपत्ता संतोष विष्णू गावडे (३०) या युवकाचा वायंगणी समुद्र किनारी शनिवारी मृतदेह आढळला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूला हा मृतदेह आढळून आला आहे. संतोष हा दिनांक १२ जुलै रोजी कामाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र दुसऱ्या दिवशीपर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरु केली होती.संतोषच्या भावाने १३ जुलै रोजी वेंगुर्ले पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. १४ जुलै सकाळी वायंगणीचे ग्रामस्थ रिचर्ड यांना संतोषचा मृतदेह आढळून आला आहे. संतोषच्या मृत्यूप्रकरणी वेंगुर्ले पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद कुंभार आणि हवालदार अच्युत परब अधिक तपास करीत आहेत.