कोल्हार येथे तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक ठार एक जखमी

प्रातिनिधिक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । कोल्हार

राहता तालुक्यातील कोल्हार येथील नवीन पुलालगत दोन मोटारसायकल व ट्रकच्या विचित्र अपघातात ट्रकच्या पुढील चाका खाली येऊन बाळासाहेब माधव काळे वय ३० रा. वडगांवपान ता. संगमनेर या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र व आणखी एक वाहनचालक गंभीर जखमी झाला. सदर घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नवीन पुलालगत घडली.

दुपारी साडेतीनच्या सुमारास कोल्हार येथील नवीन पुला दोन मोटारसायकलची जोरदार धडक झाल्याचे समजते. धडके नंतर मोटारसायकल स्वार समोरून येणाऱ्या ट्रकच्या पुढच्या चाकाखाली गेल्याने बाळासाहेब माधव काळे वय ३० रा. वडगांव पान ता. संगमनेर हा जागीच ठार झाला. तर मागील बाजूस बसलेला त्याचा सहकारी सोमनाथ काळे बाजूला पडल्याने बचावला. दरम्यान दोन्ही मोटारसायकलची धडक झाल्याने भारत मेहेत्रे रा. राऊतवाडी ता. राहुरी हा गंभीर जखमी झाल्याचे समजते. त्यास तातडीने रुग्णवाहिकेतून नगरकडे हलविण्यात आले.