नगर शहरामध्ये लीड मिळाला तरी भाजपला ही जागा मिळेल, अशी शक्यता नसल्याने नगरमध्ये भाजपमधील नाराजी उफाळून आली आहे. त्यामुळे भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले श्रीगोंदा मतदारसंघातून विधानसभा लढविण्याबाबत सूचक विधान केले आहे. पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. याबाबत पक्ष निर्णय घेईल, असेही कर्डिले म्हणाले. नगरमध्ये विखे यांना उमेदवारी देऊ नका, अशी भूमिका भाजपमधल्या अनेक नेत्यांनी घेतल्यामुळे भाजपमधील अंतर्गत धुसपुस आता चव्हाट्यावर आली आहे. आगामी काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चार दिवसांपूर्वीच भाजपाचे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेत विखेंच्या उमेदवारीबद्दल आक्षेप घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये आता विखेंच्या विरोधामध्ये त्यांच्याच पक्षातील नेते नाराजी व्यक्त करत आहेत. याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
नगर जिल्ह्यामध्ये भाजपाचे आमदार आता कमी होणार हे दिसून येत आहे. आता अजित पवार गट सोबत असल्याने नगर अजित पवार गटाने अनेक जागांवर दावा केला आहे. त्यामुळे भाजपची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे नगर शहरांमध्ये नेमकी जागा आता कोणाच्या वाटेला येणार हे जरी निश्चित नसले तर दुसरीकडे भाजपाला ही जागा मिळणार नाही त्यामुळे अनेक पदाधिकारी हे नाराज झालेले आहे तशी चर्चा भाजप वर्तुळामध्ये सध्या जोर धरू लागलेली आहे.
भाजप नेते माजी खासदार सुजय विखे पाटील विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत संगमनेर व राहुरीमधून इच्छा व्यक्त केली आहे. विखे पाटील यांनी व्यक्त केलेल्या इच्छा भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचीही अडचण झाली आहे. निवडणूक लढवण्याचे संकेत कर्डिले यांनी दिल्याने बबनराव पाचपुते यांची डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघावर दावा असणारे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर ते म्हणाले, पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. मला पैलवानकीचा छंद आहे, त्यामुळे पैलवानाला बाराही महिने व्यायाम करावा लागतो, तरच तो फडात यशस्वी होतो. तसाच मी एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीची तयारी करतो, असेही सूचक वक्तव्य कर्डिले यांनी केले आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून सध्या भाजप नेते बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. याच मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपाचे सुजय विखे यांचा लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर भाजपची चिंता वाढली आहे. नगर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार होते. आता तेवढ्या जागा मिळण्याची पक्षातील नेत्यांनाच शाश्वती नाही. तसेच महायुतीतील घटक आणि अजित पवार, शिंदे गटही काही जागांवर दावा करत असल्याने जागा एक, दावेवार अनेक अशी भाजपची स्थिती झाली आहे. आगामी काळामध्ये या दावेदारीमुळे महायुतीमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.