वनप्लसचा नवा फोन 8 जुलैला लाँच होणार

स्मार्टफोन कंपनी वनप्लस आपला नवीन फोन पुढील महिन्यात 8 जुलैला लाँच करणार आहे. या फोनचे नाव वनप्लस नॉर्ड 5 असे आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाईटवर लाँचिंगसंबंधी माहिती शेअर केली आहे. या फोनचा डिस्प्ले, कॅमेरा, सॉफ्टवेअर, रॅम, बॅटरी, चार्जिंग आणि कनेक्टिविटी कोणती दिली जाणार आहे. हे 8 जुलैला फोन लाँचिंग झाल्यानंतर स्पष्ट होईल. हा स्मार्टफोन किती स्टोरेजमध्ये येईल. तसेच या फोनची किंमत किती असेल हे सुद्धा फोन लाँचिंग झाल्यानंतर स्पष्ट होईल.