
ऑनलाइन मनी गेमिंग बंदी घालण्याची तरतूद असलेल्या विधेयकास लोकसभेनंतर आज राज्यसभेनेही मंजुरी दिली. मतचोरीच्या मुद्दय़ावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे चर्चेविनाच हे विधेयक मंजूर झाले. दोन्ही सभागृहांच्या मंजुरीमुळे लवकरच यांचे कायद्यात रुपांतर होणार आहे. त्यामुळे रमी कल्चर, ड्रीम 11, मोबाइल प्रीमियर लीग, झुपी, गेम्स 24x7 अशा अनेक ऑनलाइन गेमिंग ऍप्सना आता गाशा गुंडाळावा लागणार आहे.