ऐकावं ते नवलच; शहरात राहते फक्त एक महिला

जगात असं शहर आहे, ज्याची लोकसंख्या ऐकून तुम्ही चकीत व्हाल. या शहरात फक्त एक महिला राहते. तिच्या व्यतिरिक्त कुणीच राहत नाही. त्यामुळे ही एकमेव महिला स्वतःच शहराची महापौर आहे, स्वतःच ग्रंथपाल आहे. एलसी आयलर असे या महिलेचे नाव आहे. आणि अमेरिकेतील नेब्रास्का राज्यातील मोनोव्ही हे तिचे गाव.

2004 मध्ये आयलर यांच्या पतीचे निधन झाले आणि मोनोव्ही शहरात त्या एकटय़ाच उरल्या. त्या स्वतःच कर भरतात. निवडणुकीला उभे राहतात, स्वतःच्या निवडणुकीचा प्रचार करतात आणि स्वतःच मतदान करतात. दुसऱया महायुद्धानंतर शेतव्यवस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बिकट झाली. तेव्हा अनेकांनी ग्रामीण भागात  स्थलांतर केले. पोस्ट ऑफिस आणि शेवटची तीन-चार दुकाने 1970 च्या आसपास बंद झाली. शहरातील शाळा 1974 मध्ये बंद झाली. महिलेची मुलेही नोकरीनिमित्त  बाहेर गेली. आयलर आणि त्यांचे पती असे दोघेच उरले.