
हिंदुस्थानने एकीकडे दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान धडा शिकवला आहे. तर, दुसरीकडे सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. छत्तीसगड-तेलंगण सीमेजवळ बिजापूरमध्ये सुरू असलेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले आहेत.
सुरक्षा दलांचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगड-तेलंगण सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांजवळ चकमक झाली. “छत्तीसगड-तेलंगण सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांजवळ ही नक्षलविरोधी मोहीम सुरू आहे. आतापर्यंत येथे सुरक्षा दलांच्या कारवाईत 26 नक्षलवादी ठार झाले आहेत, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. नक्षलवाद्यांविरोधात अजूनही कारवाई सुरू आहे.”
LIVE अपडेट Operation Sindoor: हिंदुस्थानी सैन्याच्या कारवाईत 70 दहशतवादी ठार