
पहलगाम हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये सिंदूर ऑपरेशन राबवले. हिंदुस्थानने पाकमधील दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त केली. यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानवर 7-10 मे दरम्यान ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. प्रत्युत्तरात हिंदुस्थानने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 11 विमानतळं उद्ध्वस्त केले. या कारवाईची कबुली अखेर पाकिस्तानने दिली आहे. हिंदुस्थानच्या कारवाईत पाकिस्तानचे 11 सैनिक ठार झाले तर, 78 सैनिक जखमी झाले. यात पाकच्या 5 हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
तीन राफेल विमाने पाडली; खरे काय? अमेरिकेची शंका तर पाकिस्तानचा दावा; हिंदुस्थानचे मौनच
पाकिस्तानने या संदर्भात माहिती दिली आहे. अब्दुल रहमान, दिलावर खान, इकरामुल्ला, खालिद, मुहम्मद अदील अकबर आणि निसार हे पाक लष्कराचे सैनिका मारले गेले. पाकिस्तानच्या हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर उस्मान यूसुफ, मुख्य टेक्निशियन औरंगजेब, नजीब, कॉर्पोरल टेक्निशियन फारूक और वरिष्ठ टेक्निशियन मुबाशिर हे ठार झाले. पाकिस्तानच्या हवाई दलातील ठार झालेले सैनिक हे जकोकाबाद विमानतळावर तैनात होते. JF-17 विमानाच्या उड्डाणाची तयारी करत असताना शाहबाज विमानतळावर हिंदुस्थानने केलेल्या हल्ल्यात उस्मान आणि त्याचे साथी मारले गेले.