आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मीडिया सेल रात्रंदिवस काम करत आहे. या मीडिया सेलमध्ये काम करण्याची संधी शिवसैनिकांना चालून आली आहे. त्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती येत्या 25 ऑगस्ट रोजी शिवसेना भवनात घेतल्या जाणार आहेत.
डीजी राज्य समन्वयक, डीजी जिल्हा समन्वयक आणि डीजी मुंबई समन्वयक या तीन पदांसाठी या मुलाखती होणार आहेत. रविवार, 25 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता या मुलाखती होणार आहेत. इच्छुकांनी https://forms.gle/SWhsWv6dbeP4eu4f8 या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांसाठी अटी
1. सोशल मीडिया तंत्रज्ञान आणि प्लॅटफॉर्मची माहिती असणे गरजेचे आहे.
2. शिवसेना पक्षाच्या प्रचार आणि प्रसारामध्ये सोशल मीडियातून सक्रिय असणे गरजेचे आहे.
3. शिवसेना पक्षाचा प्राथमिक सदस्य असायला हवा.