सकाळी सहा वाजता ईमेल, ओरॅकलने 12 हजार हिंदुस्थानींना काढले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील एक नामांकित टेक कंपनी ‘ओरॅकल’ने तब्बल 30 हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कामावरून काढून टाकले आहे. यात 12 हजार हिंदुस्थानींचाही समावेश आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सकाळी सहा वाजता संबंधित कर्मचाऱयांना चार ओळींचा एक ई-मेल पाठवून कंपनीने हा धक्का दिला.

‘तुमच्या नोकरीसंबंधी आम्ही एक कटू पण आवश्यक बातमी देत आहोत. सध्याच्या परिस्थितीला अनुसरून पंपनीत काही रचनात्मक बदल करण्यात येत असून नव्या रचनेत तुमचे पद बरखास्त करण्यात येत आहे. त्यामुळे आज तुमचा शेवटचा दिवस आहे,’ असे पंपनीने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये नमूद केले. राजीनाम्याच्या पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर तुम्ही पंपनीने ठरविलेल्या भरपाईला पात्र असाल, असेही सांगण्यात आले. तसेच संबंधित कर्मचाऱयांचे कार्यालयीन ई-मेल आयडी अनेबल करण्यात आले.

पुढच्या महिन्यात पुन्हा कुऱ्हाड

केवळ 30 हजार कर्मचाऱ्यांना काढून ओरॅकल थांबणार नसून पुढच्या महिन्यात कपातीचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. या टप्प्यातही काही हजार कर्मचाऱयांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

‘एआय’मुळे नोकऱ्या गेल्याची चर्चा

नोकरी गेलेल्या कर्मचाऱयांमध्ये वरिष्ठ अभियंते, आर्किटेक्ट्स, ऑपरेशन लीडर्स, प्रोग्राम मॅनेजर आणि टेक्निकल स्पेशालिस्ट्सचा समावेश आहे. कामगिरीच्या आधारावर त्यांना काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे पंपनीचे एक वरिष्ठ व्यवस्थापक मायकल शेपहर्ड यांनी लिक्डइनवर सांगितले. या कर्मचारी कपातीमागे आर्टिफिशल इंटेलिजन्स असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. ओरॅकल गेल्या काही दिवसांपासून एआयमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. एआयचे काही टूल्स वापरण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे कमी कर्मचाऱयांमध्ये जास्त काम होत आहे, असेही एका अधिकाऱयाने सांगितले.