‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबईतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अशा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. शनिवार, 23 ऑगस्ट आणि रविवार, 24 ऑगस्टपासून विविध केंद्रांवर प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक 25 कलाकृतींची अंतिम फेरी 15 ते 18 सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल येथे होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबीर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेची नियमावली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.