सोशल मीडियाच्या विश्वात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमतेद्वारे तयार केलेले डीपफेक प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात.आत्तापर्यंत अभिनेत्री रश्मिका मंदाना, आलिया भटपासून ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील डीपफेक व्हिडीओचे बळी ठरले होते. अशातच फिल्म इंडस्ट्रीमधील एका प्रसिद्ध अभिनेत्री प्रायव्हेट व्हिडीओ लीक प्रकरणामुळे चर्चेत आली. तमिळ आणि मल्ल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ओवियाचा एक व्हिडीओ मीडियावर व्हायरल होतोय.
View this post on Instagram
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये अभिनेत्री आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी हा डीपफेक व्हिडीओ असल्याचा दावा केला आहे. मात्र या व्हिडीओवर अभिनेत्रीने कोणताही खुलासा केला नाही. पण, अभिनेत्रीनं नुकताच तिच्या इन्स्टा अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला. त्य़ा फोटोच्या कमेंटमध्ये ओवियाला प्रचंड ट्रोल केलं जात आहे . एका युजरने तिला व्हायरल होत असलेल्या तिच्या खासगी व्हिडीओचा आणखी एक पार्ट शेअर करायला सांगितलं. तर यावर उत्तर देताना अभिनेत्रीने लिहिले – पुढच्या वेळी नक्की… असे तिने म्हंटले आहे. यापैकी काही कमेंट्सचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केले जात आहेत.
अभिनेत्री ओवियानं 2009 मध्ये तमिळ सिनेमांमधून आपल्या करिअरला सुरूवात केली. 2009 मधील ‘नालाई नामधे’ या चित्रपटात तिने पहिला डेब्यू केला होता. त्यानंतर तिनं ‘सिल्लानु ओरू संदिप्पू’, ‘यामिरुक्का बायमी’, ‘हॅलो नान पेई पेसुरेन’, ‘मुथुक्कू मुथागा’ आणि ‘गणेश मींडम संथिपोम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय अभिनेत्रीने बहुचर्चित रिआलीटी शो बिग बॉस (तमिळ) मध्येही सहभाग घेतला होता. तेव्हापासूनच ओविया प्रसिद्धीच्या झोतात आहे.