बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या मराठी चित्रपट सृष्टीत चर्चेचा विषय बनली आहे. प्रियांका चोप्राने निर्मिती केलेला पाणी हा चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला.
पाणी या चित्रपटात मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री रुचा वैद्य मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
मराठवाड्यातील पाण्याची समस्या आणि या समस्येला तोंड देणारे हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षावर ‘पाणी’ चित्रपट आधारित आहे.
दरम्यान ‘पाणी’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आदिनाथ व रुचाने रोमँटिक अंदाजात फोटोशूट केले आहे.
या फोटोमध्ये आदिनाथने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर रुचाने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
या फोटोशूटमध्ये दोघेही कमालीचे सुंदर दिसत असून यांच्या जोडीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
‘एकली ही जरी वाटं.. रखमायी तुया साथं.. नगं थांबू रं.. करून दावं रं.. आता पान्याचा घूमे नादं.. चल चल.. – आदी’ असे कॅप्शन आदिनाथने या फोटोंना दिले आहे.