
जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या ठिकाणी सुरक्षा रक्षक का नव्हते असा सवाल उपस्थित केला जात होता. पण सरकारने यावर आता स्पष्टीकरण दिले आहे. या भागातील स्थानिक टूर ऑपरेटर्संनी सरकारच्या परवानगीशिवाय पर्यटकांना आणले त्यामुळे इथे कुठलीच सुरक्षा नव्हती असे सरकारने म्हटले आहे.
NDTV ने याबाबत वृत्त दिले आहे. त्यानुसार जिथे दहशतवादी हल्ला झाला आहे तो भाग अमरनाथ यात्रेच्या वेळी उघडला जातो. अमरनाथ यात्रेला आलेले भाविक इथे आराम करतात. या वेळी स्थानिक टूर कंपन्यांनी सरकारा कुठलीच माहिती न देता पर्यटकांची बुकिंग घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आले. ही बाब सरकारला माहित नव्हती त्यामुळेच इछे कुठल्याही प्रकारची सुरक्षा नव्हती असे सरकारने म्हटले आहे.