हिंदुस्थानने डिवचल्यास जोरदार प्रत्युत्तर मिळेल, आसीम मुनीर यांची पोकळ धमकी

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीम मुनीर यांनी हिंदुस्थानला पुन्हा धमकी दिली आहे. ‘हिंदुस्थानने आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास निर्णायक आणि जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी लष्करी अकादमीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘पुन्हा संघर्षाची वेळ आल्यास पाकिस्तान अपेक्षेपेक्षा घातक प्रत्युत्तर देईल. आमच्या शस्त्रास्त्रांचा पल्ला आणि मारक क्षमता प्रचंड आहे. हिंदुस्थानच्या आपल्या विशाल भूप्रदेशाचा जो भ्रम आहे तो चुकीचा ठरवण्याची ताकद या शस्त्रांमध्ये आहे, अशी मल्लिनाथीही मुनीर यांनी केली.