पाकिस्तानी विमानांसाठी मंगळवारी बोली ढ़ढ़ढ़

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (पीआयए) च्या विक्रीसाठी पुढच्या आठवडय़ात 23 डिसेंबरला बोली लागणार आहे. कर्ज चुकवण्यासाठी या एअरलाईनची विक्री केली जाणार आहे. पाकिस्तानकडे 34 एअरक्राफ्ट आहेत. यामध्ये केवळ 18 विमाने चांगली आहेत, परंतु विमान कंपनीकडे 97 देशांसोबत व्हॅल्युएबल लँडिंग स्लॉट आणि एअर सर्व्हिस एग्रीमेंट आहे. त्यामुळे बोली लावणाऱयांसाठी हे फायदेशीर ठरू शकते.