
सामना ऑनलाईन,इस्लामाबाद
हिंदुस्थानने जर पुन्हा पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक केला तर त्यांना आमच्या दहा सर्जिकल स्ट्राइकचा मुकाबला करावा लागेल अशी धमकी पाकिस्तानी लष्करातील इंटर सर्व्हिसेसचे जनसंपर्क विभागाचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी दिली आहे. हिंदुस्थानी जकानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ‘सर्जिकल स्ट्राइक’ केले त्याला दोन कर्षांचा कालाकधी लोटला आहे. हिंदुस्थानची ही कारकाई पाकिस्तानच्या जास्तच जिक्हारी लागली आहे.
आसिफ गफूर हे पाकिस्तान लष्कराच्या इंटर सर्क्हिसेसच्या जनसंपर्क किभागाचे प्रकक्ते आहेत. पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यासोबत आसिफ गफूर लंडन येथे गेले असता तेथे वृत्तसंस्थांशी बोलताना त्यांनी ही धमकी दिली. हिंदुस्थानने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एक सर्जिकल स्ट्राईक केला आहे. ‘रेडिओ पाकिस्तान’ने यासंदर्भात दिलेल्या वृत्तानुसार आसिफ गफूर यांनी धमकी देताना म्हटले आहे की, कुणी जर आमच्याविरुद्ध कसलेही षड्यंत्र रचत असतील त्यांना आम्ही चोख उत्तर देऊ ते म्हणाले, पाकिस्तानी लष्कराकडे चीन-पाकिस्तान आर्थिक कॅरिडोरच्या संरक्षणाची जवाबदारी असून या योजनेमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत होईल. पाकिस्तानी सेनेला देशातील लोकशाही मजबूत करायची आहे आणि जुलैमध्ये झालेली सार्वत्रिक निवडणूक अतिशय पारदर्शी होती. हिंदुस्थानकडून एक सर्जिकल स्ट्राइक झाला तर पाकिस्तानकडे दहा सर्जिकल स्ट्राइक करण्याची क्षमता आहे, असेही गफूर यांनी म्हटले.


























































