पाकड्यांची मुजोरी सुरूच; नियंत्रण रेषेवर तणाव वाढला; सलग सातव्या दिवशी एलओसीवर गोळीबार

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानची मुजोरी सुरुच असून सलग सातव्या दिवशी पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यामुळे नियंत्रण रेषेवर तणाव कमालीचा वाढला आहे.

पाकिस्तानने बुधवारी मध्यरात्री जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा, उरी आणि अखनूर या सीमेवर गोळीबार केला. सलग सातव्या दिवशी पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार करत शस्त्रसंधींचे उल्लंघन केले. याला हिंदुस्थानी लष्कराने जोख प्रत्युत्तर दिले.

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. तेव्हापासून हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानकडून गेल्या 7 रात्रींपासून एलओसीवर हलक्या शस्त्रांद्वारे गोळीबार सुरू आहे. हा गोळीबार थांबवण्याचा इशाराही हिंदुस्थानी लष्कराने दिला होता. मात्र बुधवारी रात्रीही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यामुळे 2003 मध्ये करण्यात आलेला शस्त्रसंधीचा करारच धोक्यात आला आहे.

Pahalgam Attack – मध्यरात्री मोठ्या घडामोडी, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांना फोन