
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने उचललेल्या कठोर पवालांनी पाकिस्तान बिथरला असला तरी त्यांच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सलग दहाव्या रात्री त्यांनी नियंत्रण रेषेवरील हिंदुस्थानी चौक्यांना लक्ष्य करत छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पुंछ, राजौरी, मेंढार, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. हिंदुस्थानी लष्कराने या गोळीबाराला जबरदस्त प्रत्युत्तर दिले.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सलग नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात येत आहे. शनिवारी सलग दहाव्या दिवशी पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. याआधी 2 आणि 3 मे च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांचा विनाकारण गोळीबार केला. हिंदुस्थानी लष्कराने सीमेवर झालेल्या गोळीबाराला लगेच आणि तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले.