
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांतील तणाव आणखी वाढला आहे. हिंदुस्थानात आता पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री माहिरा खान आणि हनिना आमीर यांचे इन्स्टा अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्याआधी या पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टा अकाऊंट हिंदुस्थानात दिसत होते, परंतु आता हे अकाऊंट ओपन केल्यास त्यावर अकाऊंट नॉटअव्हेलेबल इन इंडिया असा मेसेज येत आहे. याआधी हिंदुस्थानने 16 पाकिस्तानी यूट्यूबर्स चॅनेल्सवर कारवाई करत बंदी घातली आहे.