कोलकातामधील घटनेवर कवितेतून व्यक्त केली वेदना, POK मधील तरुणीला तुरुंगवासाची शिक्षा

कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचारासंदर्भात एका महिला ब्लॉगरने एक कविता शेअर केली होती. मात्र अशा गंभीर विषयावर कविता शेअर करणे या महिला ब्लॉगरला  महागात पडले आहे. या कवितेतून ब्लॉगरने निंदा केल्याच्या आरोपातून तिला अटक केली आहे.

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये राहणारी ब्लॉगर अस्मा बतूल हिने महिलांच्या अत्याचारावर सलमान हैदरची एक कविता शेअर केली आहे. यासोबत तिने ‘बलात्कार झाला तेव्हा अल्लाह, भगवान किंवा ईश्वर हे सर्व उपस्थित होते. एक कॅप्शनही लिहिले आहे. अस्माने फेसबूकसह इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आणखी एक कविता ऐकवली. यानंतर अनेक मौलवींनी अस्मा यांच्यावर अल्लाहचा अपमान केल्याचा आरोप केला. त्यामुळे पोलिसांनी अस्मावर गुन्हा दाखल केला असून अल्लाहचा अपमान केल्याप्रकरणी अटक केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Asma Batool (@batool_asma_)

दरम्यान या घटनेनंतर अस्माच्या घरावर जमावाने हल्ला केला. या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात काही मौलवीही दिसत आहेत, अशी तक्रार अस्माच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. यावेळी जमावाने जीवे मारण्याची धमकी देऊन घर पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. मात्र यावेळी काहींनी अस्माच्या समर्थनार्थ आवाज उठवला.