
हिंदुस्थानी महिला संघाने रविवारी दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव करत 52 धावांनी जेतेपद पटकावले. त्यांच्या या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. कर्णधार हरमनप्रीतच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याचा जल्लोष साजरा होत असताना क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. क्रिकेटपटू स्मृती मंधाना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ती म्युझिक कंपोझर पलाश मुच्छलसोबत लग्न करणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या महिला संघाची कौतुक करणारी पलाशची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
हिंदुस्थानी संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने विश्वचषक सामन्याच्या अंतिम सामन्यात 45 धावा केल्या. माजी कर्णधार मिताली राजचा विक्रमही मोडला आहे. त्यामुळे महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा मान तिने पटकावला आहे. हा सगळा आनंद असतानाच लगीनघाई सुरू होणार आहे. लवकरच ती पलाशसोबत लग्न करणार आहे. हिंदुस्थान संघाच्या विजयानंतर पलाशची पोस्ट आता चर्चेत आली आहे. त्याने हिंदुस्थानी संघाचे अभिनंदन करत स्मृतीचा ट्रॉफीसोबत फोटो शेअर केला आहे. त्याच्यामध्ये पलाशच्या हातावर SM18 हा टॅटूही दिसत आहे. शिवाय ही पोस्ट शेअर करत असताना त्याने खाली सबसे आगे है हम हिंदुस्थानी अशी फोटोओळ लिहीली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेण्ट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
स्मृती मंधाना आणि संगीतकार-पटकथाकार पलाश मुल्छल दोघं 20 नोव्हेंबर रोजी लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
            
		





































    
    
























