
1 आर्थिक गोष्टींसाठी आवश्यक असलेले आधारकार्डप्रमाणे पॅनकार्डसुद्धा अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे. पॅनकार्डचा बऱयाच कामांसाठी वापर केला जातो.
2 जर पॅनकार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. असे जर झाले तर चिंता करण्याची आवश्यकता नाही.
3 तुमच्याकडे ई-पॅनकार्ड असेल तर ते फिजिकली पॅनकार्ड म्हणून उपयोगी पडू शकते. ई-पॅनवरून सर्व कामे केली जाऊ शकतात.
4 जर तुम्हाला ई-पॅन कार्ड डाऊनलोड करायचे असेल तर ते एनएसडीएलच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ते डाऊनलोड करू शकता.
5 नवीन पॅनकार्डसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. प्रोसेसिंग फी म्हणून आवश्यक रक्कम भरा. डाऊनलोड ई-पॅनवर क्लिक करून पॅनकार्ड मिळवा.

























































