पणजी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार ?

सामना ऑनलाईन, पणजी

मनोहर पर्रिकरांच्या निधनामुळे पणजी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. तिथे पोटनिवडणूक होणार असून भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत बरीच उत्सुकता आहे. या उमेदवारी निवडीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर,आयुष मंत्री श्रीपाद नाईक, संघटन मंत्री सतीश धोंड, सरचिटणीस सदानंद तानावडे यांची बुधवारी बैठक झाली. या नेत्यांनी पणजी मनपाच्या नगरसेवकांची मते स्वतंत्रपणे जाणून घेतली.

पणजीच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकर आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची नावे चर्चेत आहेत.पणजी मधील कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या भाजपच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे,अशी माहिती आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.