पंचायत समिती निवडणूक – उमेदवारी न मिळाल्याने रत्नागिरीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

रत्नागिरी तालुक्यातील कुवारबांव पंचायत समिती गणात भाजपला उमेदवारी न मिळाल्याने भाजपमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.भाजपच्या 50 हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कुवारबाव पंचायत समिती गणात भाजपला उमेदवारी हवी होती. मात्र शिंदे गटाने तिथे आपला उमेदवार जाहीर केला त्यामुळे भाजपचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. 50 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शिंदे गट अडचणीत सापडला आहे.