पंकजा मुंडे या सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांच्या एका कट्टर कार्यकर्त्याला त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी दमबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फेसबुक पोस्ट करून संबंधित व्यक्तीने माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकजाताईच्या खास कट्टर कार्यकर्त्याला ताईच्या दोन तीन पीए आणि कार्यकर्त्यांनी संबधित व्यक्तीच्या घरी जाऊन मारहाण केली. या घटनेचा निषेध करत दमबाजी झालेल्या कार्यकर्त्याने फेसबुकवर पोस्ट केली. या घटनेचा निषेध करत कारवाई करण्याचे मागणी फेसबुक पोस्टमधू केली. आता ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. पंकजाताईंसाठी रात्रंदिवस झटून वेगवेगळ्या समाजाच्या विरोधात जाऊन काम केले, तरी ही वागणूक मिळत असेल तर हा ताईंचा पराभव आहे. जेव्हा ताईविरोधात काही बोललं जात तेव्हा हे कार्यकर्ते कुठे असतात? असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, दमबाजी झालेल्या कार्यकर्त्याने केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पंकजाताईंच्या काही कार्यकर्त्यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत एक्सवर पोस्ट केली आहे. या बाबत पंकजा मुंडे काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
अक्षय मुंडे असे दमबाजी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझी बायको लेकरं घरी एकटे असताना रात्री 11 वाजता मला धमक्या दिल्या जात आहेत. घरी येऊन घरात धिंगाणा घालत आहेत, यांच्यात दम होता तर मी असताना यायचे ना, ताईबद्दल अपशब्द बोलले जातात तेंव्हा हे लोक शेपूट घालून बसतात, तेव्हा लढायला पुढच्या कडेला आम्ही असतो तेव्हा यांचयामध्ये विरोध करण्याचा दम नसतो.