पंकजा मुंडे यांनी ग्रामविकासातून साकारली अनोखी योजना

7739

ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी निधीचा योग्य विनियोग व नियोजन करत ग्रामविकासाच्या माध्यमातून मतदारसंघातील गांवा-गांवात अनोखी योजना राबविली आहे. सौर अभ्यासिका, आजी आजोबा पार्क, खुली व्यायामशाळा आणि हायमास्ट दिव्यांनी गावांचे रूपडे बदलत असून या योजनेचे ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या परळी मतदारसंघाला सत्तेचा पुरेपूर वाटा मिळावा यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांची तळमळ सुरू आहे. स्वतःच्या खात्यामार्फत 2515चा कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे प्रत्येक गांवात मुलभूत सोयी सुविधांची कामे होऊ शकली, अंतर्गत रस्ते, नाल्या, सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा खोल्या, अंगणवाडीची कामे, प्रवाशी निवारा आदी असंख्य कामे सध्या सुरू आहेत. प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हावे, त्याठिकाणी स्वच्छता असावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

अनोख्या योजनेने गांवचे रूप बदलले

पंकजा मुंडे हया केवळ रस्ते, नाल्या व इमारती बांधून थांबल्या नाहीत तर त्यांनी  गांवा-गांवात शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सौर अभ्यासिका (147 गावांत प्रत्येकी 4.25 लक्ष), ज्येष्ठ नागरिकांना  आजी-आजोबा पार्क (144 गावांत प्रत्येकी 2 लक्ष), तरूणांसाठी ओपन जिम (खुली व्यायामशाळा) 147 गावांत प्रत्येकी 2 लक्ष 50 हजार आणि 146 गावांत प्रमुख चौकात दोन जागेवर  हायमास्ट दिवे त्यासाठी 4 कोटी 38 लाख रुपये आदी कामे प्राधान्याने हाती घेतली आहेत.  त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे, या निधीतून सध्या टोकवाडी, लिंबुटा, देशमुख टाकळी आदी ठिकाणी  सुरू असलेली उत्कृष्ट दर्जाची कामे पाहून ग्रामस्थ व तरूण वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या