तामीळनाडूत भाजपला धक्का, ओपीएस यांचा पक्ष एनडीएतून बाहेर

तामिळनाडूत राजकीय बस्तान बसवू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री पन्निरसेल्वम (ओपीएस) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने भाजपप्रणित एनडीएला रामराम ठोकला आहे.

पन्निरसेल्वम यांनी आज ही घोषणा केली. बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना पन्निरसेल्वम व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट झाली. या भेटीनंतर काही तासांतच ओपीएस यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. भेटीसाठी वेळ मागूनही पंतप्रधान मोदी यांनी ओपीएस यांना प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे ते नाराज होते.