नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, लोक NDA ला मतदान करणार नाहीत – पप्पू यादव

नितीश कुमार निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असं खासदार पप्पू यादव म्हणाले आहेत. एका आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, “बिहारचे लोक एनडीएला मतदान करणार नाहीत.”

पत्रकार परिषदेत बोलताना पप्पू यादव म्हणाले की, “बिहारमधील संपूर्ण जनता एकजूट आहे आणि त्यांना एनडीएला मतदान करायचे नाही. यावेळी जनता महाआघाडीला मतदान करतील.” ते म्हणाले आहेत की, “छठपूजेनंतर बिहारमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणूक रॅली होतील.”

दरम्यान, बिहार निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान ६ नोव्हेंबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी होईल. निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.