
परळमधील सुभाष डामरे मित्र मंडळ व शिवराज प्रतिष्ठान यांच्या वतीने मुंबईतील 25 कर्तृत्ववान महिलांना स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंडळाचे संस्थापक आनंद गांवकर व संचालक शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार महेश सावंत, उर्मिला पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
शिवडी विधानसभा प्रमुख गौरी चौधरी, नगरसेविका उर्मिला पांचाळ, भारती पेडणेकर यांच्या हस्ते या महिलांचा सत्कार करण्यात आला. उर्मिला पांचाळ, सुवर्णा गुराम, निलम मिरगळ, जान्हवी डामरे, संगीता शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. तर मंडळाचे मानद अध्यक्ष नाना फाटक, अध्यक्ष संतोष कांबळी, कार्यध्यक्ष प्रभाकर मोरजकर, बबन शिरोडकर, सरचिटणीस रवींद्र ओटवकर, रुपेश कोचरेकर, सूर्यकांत शिंदे, प्रफुल्ल गांवकर, प्रवीण वेंगुर्लेकर, रवींद्र कांदळकर, प्रवीण घोले, दिनेश लोखंडे, अभिषेक गवाणकर, अथर्व सावंत यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. सूत्रसंचालन मयुरी परब यांनी केले.





























































