Paris Olympic 2024 – खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी IOA ला देणार 8.5 कोटी रुपये; BCCI ची मोठी घोषणा

पॅरिस ऑलिम्पिकचा थरार 26 जुलैपासून सुरू होणार आहे. हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंचे पथक पदकांची लयलूट करण्यासाठी सज्ज झाले आहे. देशभरातील चाहते आपल्या खेळाडूंना पाठिंबा दर्शवण्यासाठी आतुर झाले आहेत. अशातच आता BCCI ने खेळाडूंना पाठिंबा दर्शवण्यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनला 8.5 कोटी रुपये देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

जगभरातील चाहत्यांच्या नजरा पॅरिस ऑलिम्पिकवर खिळल्या आहेत. 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधील पॅरिस ऑलिम्पिकचा थरार रंगणार आहे. दरम्यान बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठी घोषणा करत इंडिय ऑलिम्पिक असोसिएशनला (IOA) पाठिंबा दर्शवत 8.5 कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. जय शहा यांनी सोशल मीडिया अकाउंट X वरून त्यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी ट्वीट करत लिहीले की, मला जाहीर करताना अभिमान वाटतो की, BCCI 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या खेळाडूंना पाठिंबा दर्शवत आहे. त्यामुळेच आम्ही या मोहिमेसाठी IOA ला 8.5 कोटी रुपये देत आहोत.” अस म्हणत जय शहा यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.