पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानची महिला कुस्तीपट्टू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यावरून विरोधी पक्षांनी आज लोकसभेत एनडीए सरकारला अक्षरशः घेरले. ‘जवाब दो… जवाब दो… क्रीडामंत्री जवाब दो’ म्हणत प्रचंड गदारोळ घातला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत हा मुद्दा उपस्थित झाला. विरोधकांच्या दबावामुळे अखेर सरकारच्या वतीने क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी उत्तर दिले, मात्र त्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. या उत्तरानंतर विरोधकांना प्रश्न विचारायचे होते, परंतु लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना बोलू दिले नाही. नियमांचा हवाला देत त्यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी सभात्याग केला. सभात्याग केल्यानंतर विरोधकांनी संसदेबाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘विनेश पह्गाटच्या विरोधात षड्यंत्र रचणे बंद करा… बंद करा…’, ‘विनेश फोगाटला न्याय द्या… न्याय द्या…’ अशा घोषणा त्यांनी दिल्या.
विनेशच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला? – काँग्रेस
विनेश पह्गाटच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला? कुणाला तिच्या जिंकण्यामुळे त्रास होणार होता? ही मुलगी जिंकते, परंतु नंतर अपात्र ठरते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारमधील मंत्र्यांनी तिचे सांत्वन करणारे ट्विट केले. आम्हाला असे ट्विट नको, आम्हाला न्याय हवा, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एनडीए सरकारवर निशाणा साधला.
पदक मिळू नये म्हणून कटकारस्थान – विजेंदर सिंह
या सगळय़ा प्रकारात हिंदुस्थानला पदक मिळू नये असा कट असू शकतो असा संशय हिंदुस्थानचा ऑलिम्पिकपटू, बॉक्सर विजेंदर सिंहने व्यक्त केला आहे. खेळात बऱयाच तांत्रिक बाबी असतात. 100 ग्रॅम वजन अधिक असेल तर त्या खेळाडूला एक संधी दिली जाते, परंतु खेळाडूलाच अपात्र करणे हा खूप कठोर निर्णय आहे. असा निर्णय का घेतला गेला हे मला कळत नाही, असे विजेंदर सिंहने म्हटले आहे.
क्रीडामंत्री काय म्हणाले?
केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत विनेश पह्गाट अपात्रताप्रकरणी केंद्र सरकारच्या वतीने भूमिका मांडली. विनेश पह्गाटचे वजन 50 किलो किंवा त्यापेक्षा कमी असणे अपेक्षित होते, परंतु ते जास्त भरल्यामुळे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या नियमांनुसार विनेशला अपात्र ठरवण्यात आले, असे मांडवीय म्हणाले. विनेश पह्गाटच्या तयारीसाठी सरकारने जी हवी होती ती सर्व मदत दिली. तिला वैयक्तिक कर्मचारीही देण्यात आले. विनेशसोबत हंगेरीचे प्रसिद्ध प्रशिक्षक होलेर अपोस आणि फिजिओ अश्विनी पाटील नेहमी असतात. या कर्मचाऱयांसाठी विशेष आर्थिक तरतूदही करण्यात आली. पॅरिस ऑलिम्पिकसाठी विनेशच्या तयारीसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी 70 लाख 45 हजार 775 रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली, असे सांगत मांडवीय यांनी विनेशसाठी सरकारने केलेल्या खर्चाची यादी लोकसभेत वाचून दाखवली.