
पॅरिस ऑलिंम्पिक 2024 मध्ये हिंदुस्थानच्या खात्यात दुसरे पदक आलेले आहे. हिंदुस्थानची नेमबाज मनू भाकरने आणखी एक बाजी मारत पॅरिस ऑलिंम्पिक 2024 मध्ये दुसऱ्या पदकावर शिक्कामोर्तब केले आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे. दोघांनी दक्षिण कोरियाच्या ओह ये जिन आणि ली वोन्हो यांचा पराभव करत कांस्य पदक पटकावले आहे.
! Many congratulations to Manu Bhaker and Sarabjot Singh on securing a superb Bronze for India in the mixed team 10m Air Pistol event.
A second Bronze for Manu Bhaker at #Paris2024, a terrific achievement.
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 30, 2024
पॅरिसमध्ये हिदुस्थानची दुसरी पदक विजेती ठरलेल्या मनू भाकरने आपल्या विजयासह इतिहास रचला. मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी हिंदुस्थानची पहिली नेमबाज ठरली आहे.. याआधी अनेक हिंदुस्थानी खेळाडूंनी वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली असली तरी मनूने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले.