संसदच सर्वोच्च, त्यापेक्षा वर काहीही नाही, खासदार हे खरे मालक – जगदीप धनखड

“संसद सर्वोच्च आहे आणि कोणीही त्यापेक्षा वर असू शकत नाही. खासदार हेच खरे मालक आहेत. संविधान कसे असेल हे तेच ठरवतात. त्यांच्यावर इतर कोणीही सत्ता गाजवू शकत नाही”, असं वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. दिल्ली विद्यापीठात संविधानावर आयोजित कार्यक्रमात धनखड भाषण करताना असं म्हणाले आहेत.

याआधी 17 एप्रिल रोजी धनखड म्हणाले होते की, “सर्वोच्च न्यायालय सुपर संसदेप्रमाणे काम करत आहे. संविधानातील कलम-142अंतर्गत कोर्टाना मिळालेले अधिकार हे लोकशाही शक्तीविरोधात 24 तास उपलब्ध असलेले न्युक्लियर मिसाईल बनले आहे.”

दरम्यान , राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनी सरकारच्या कोणत्याही विधेयकाला तीन महिन्यांच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला होता. यावर नाराजी व्यक्त करत ते असं म्हणाले होते. यानंतर आता त्यांचं येऊ नवीन वक्तव्य समोर आलं आहे. ज्यात ते संसद सर्वोच्च आहे आणि कोणीही त्यापेक्षा वर असू शकत नाही, असं म्हणाले आहेत.