मौसम का मजा लीजिए! दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरून विरोधकांचं संसद परिसरात आंदोलन

राजधानी दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणावरून विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारात आज आंदोलन केले. यावेळी “मौसम का मजा लीजिए” असे बॅनर घेत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरून संसदत परिसरात विरोधी पक्षांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर खासदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासर विरोधी पक्षांमधील अनेक खासदार या आंदोलनात सहभागी झाले. अनेक खासदारांनी यावेळी मास्क लावले होते. संसदेत वायू प्रदूषणावर चर्चा घ्यावी, अशी मागणी यावेळी विरोधी पक्षांकडून करण्यात आली.

प्रदूषणामुळे मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य समस्या भेडसावत आहेत. आणि दरवर्षी परिस्थिती बिघडत आहे. तरीही ठोस कारवाई होत नाही. या मुद्द्यावर सरकारने कारवाई करावी आम्ही सरकारसोबत आहोत. हा कुठला राजकीय मुद्दा नाही, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या.