14 कोटींहून अधिक लोकांचे पासवर्ड लीक

गेल्या काही महिन्यांपासून 149 मिलियनहून अधिक ई-मेल्स आणि पासवर्डस् इंटरनेटवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. हा डेटा एका कंपनीच्या सर्व्हरमधून चोरला नसून अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि अ‍ॅप्समधून आधीच चोरला असल्याचे दिसत आहे. हा सर्व जुना डेटा लीक्सला जोडून एक नवीन डेटाबेस तयार करण्यात आला आहे. यामुळेच जीमेल, फेसबुक, इन्स्टाग्राम, नेटफ्लिक्स, पेपल यांसारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्म्सचे युजर्स चिंतेत सापडले आहेत. त्यांना भीती आहे की, त्यांचाही डेटा यात असू शकतो. अनेकांनी भीती व्यक्त केली आहे की, ई-मेल आणि पासवर्ड यामध्ये असू शकतो.