
विद्यार्थी, तरुण आणि शिक्षकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी अस्मिता संचालित जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालय येथे क्विक हिल फाउंडेशन आणि पाटकर-वर्दे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सुरक्षा’ जागरूकता अभियान आयोजित करण्यात आले.
‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित पाटकर-वर्दे महाविद्यालयाचे प्रशिक्षित विद्यार्थी सायबर वॉरियर्स वेदांत गोसावी आणि साहिल ढेबे यांनी या वेळी सादरीकरण केले. या सत्रात विद्यार्थी आणि शिक्षकांना सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, फसवणूक टाळणे, गोपनीयता राखणे, सायबर गुन्ह्याची तक्रार करणे आणि सुरक्षित ऑनलाईन वावर याबाबत धडे देण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका विजया गोळे यांनी शालेय विज्ञान मंडळ प्रमुख वळपुंदे आणि रश्मी मयेकर यांच्या मदतीने शालेय विज्ञान मंडळांतर्गत हा उपक्रम पार पाडला.


























































