
१५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानसोबत खेळण्यास नकार दिल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) २०२४-२७ या आर्थिक चक्रात पाकिस्तानला सुमारे १४४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४० अब्ज पाकिस्तानी रुपये) मिळणार आहेत, परंतु हिंदुस्थानसोबतच्या सामन्यावरून घेतलेली भूमिका या कराराला धोक्यात आणू शकते.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला आयसीसीकडून वर्षाला साधारण ३८ दशलक्ष डॉलर्स मिळतात. जर आयसीसीने हिंदुस्थानसोबत न खेळल्याबद्दल पाकिस्तानवर दंडात्मक कारवाई केली, तर पीसीबीच्या या हिश्यावर मोठी कपात केली जाऊ शकते. पीसीबीने अलीकडेच लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथील स्टेडियमच्या नूतनीकरणावर १८ अब्ज रुपये खर्च केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या तिजोरीवर आधीच ताण आहे.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील एका सामन्यातून ब्रॉडकास्टर्सना (प्रक्षेपणकर्ते) किमान २५० दशलक्ष डॉलर्सची कमाई अपेक्षित असते. सध्याच्या चक्रात ब्रॉडकास्टर्सनी आयसीसीला ३ अब्ज डॉलर्स मोजले आहेत. जर हाय-व्होल्टेज हिंदुस्थान-पाकिस्तान सामने झाले नाहीत, तर ब्रॉडकास्टर्स आयसीसीकडे नुकसान भरपाईची मागणी करतील, ज्याचा थेट परिणाम पाकिस्तानला मिळणाऱ्या निधीवर होईल.
आयसीसीच्या निधी व्यतिरिक्त पीसीबीला पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधून वर्षाला सुमारे ४२ दशलक्ष डॉलर्स मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये दोन नवीन फ्रँचायझींच्या समावेशाचा मोठा वाटा आहे. मात्र, आयसीसीने दंड ठोठावल्यास केवळ पीएसएलच्या जोरावर पाकिस्तान क्रिकेट चालवणे कठीण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
pcb in financial trouble: pakistan could lose pkr 40 billion from icc over india match boycott
pakistan cricket board faces massive financial penalties from icc for refusing to play against india in t20 world cup. check how mohsin naqvi’s pcb might lose billions.

























































