पेडर रोडची भिंत नव्याने बांधणार, वाहतूक एका बाजूने सुरू

253

पेडर रोडच्या बी. जी. खेर मार्गावरील  300 मीटर लांबीच्या भिंतीचा 15 टक्के भाग कोसळला असला तरी संपूर्ण भिंत कलंडल्याने धोकादायक बनली आहे. त्यामुळे संपूर्ण भिंत  नव्याने बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दरम्यान, कोसळलेली झाडे हटवण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती ‘डी’ वॉर्डचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. संपूर्ण भिंत धोकादायक बनल्यामुळे तुर्तास पायलिंगचा आधार देऊन एका बाजूने वाहतूक सुरू ठेवणार असल्याचे ते म्हणाले.

मुसळधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे पालिकेच्या ‘डी’ प्रभागात पेडर रोडजवळ एन. एस. पाटकर मार्गालगत असणारी संरक्षक भिंत खचल्याने 50 हून अधिक झाडे उन्मळून पडल्याची घटना बुधवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. पेडर रोडकरून बाबुलनाथ परिसराच्या दिशेने येताना एन. एस. पाटकर मार्ग असून या रस्त्याच्या करच्या बाजूस नेहरू उद्यानाकडून येणारा बी. जी. खेर मार्ग आहे. बी. जी. खेर मार्गाची 300 मीटर लांबीची संरक्षक भिंत ही पाटकर मार्गाला लागून आहे. दक्षिण मुंबईत झालेल्या जोरदार पाकसामुळे संपूर्ण भिंत कलंडली आहे तर सुमारे 15 टक्के भाग कोसळला. त्यामुळे ही भिंत नव्याने बांधण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र वाहनचालकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.

पाणीपुरवठय़ासाठी 38 टँकर

संरक्षक भिंत खचल्याने या ठिकाणाहून जाणाऱ्या 4 जलकाहिन्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे एन. एस. पाटकर मार्ग, ए. के. मार्ग, पेडर रोड, सोफिया लेन, कार्माईकेल मार्ग, राघोजी मार्ग, फॉर्जेट हिल क रोड, अल्टामाऊंट रोड आदी भागांत पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेच्या माध्यमातून 38 टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या