
गणेशोत्सवाच्या धामधुमीनंतर आज मुंबईत मांसाहारप्रेमींची चिकन आणि मटणाच्या दुकानांवर गर्दी झाली होती. मंडयांमध्येही मासे खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली होती. गणेशोत्सवानंतरच्या आजच्या पहिल्याच रविवारी मुंबईत लाखो कोंबडय़ा आणि मटण विकले गेले.
श्रावण महिन्यात मांसाहार टाळणारे बहुतांश लोक भाद्रपदातील गणेशोत्सवानंतरच पुन्हा मांसाहाराला सुरुवात करतात. शनिवारी अनंत चतुर्दशीला मोठय़ा उत्साहात गणेश विसर्जन केल्यानंतर आज रविवारच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी मांसाहारावर अक्षरशः ताव मारला.
मासळी बाजाराचे आज खऱया अर्थाने बोलीभाषेतील गोंधळाप्रमाणे मच्छी मार्पेट झाल्याचे दिसून आले. मोठय़ा संख्येने लोकांनी मासळी खरेदीसाठी गर्दी केली होती. यंदाच्या वर्षी बोंबील माशांची पैदास मोठय़ा प्रमाणात झाल्याने बाजारात बोंबलांचे ढीग दिसत होते. चिकन आणि मटणाच्या दुकानांबाहेरही खवय्यांच्या रांगा लागल्या होत्या. चिकनचा दर 200 रुपये किलो, तर मटण 800 रुपये किलो होते. श्रावण महिन्यात चिकन, मटण आणि मासे विव्रेत्यांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आज विव्रेतेही ग्राहकांचे स्वागत मोठय़ा आनंदाने करत असल्याचे दिसून आले.
तळीरामांनी बार भरले
मांसाहाराबरोबरच मद्यपानही श्रावण महिन्यात वर्ज्य करणाऱयांची आज बार आणि वाईन शॉप्समध्ये गर्दी होती. अनंत चतुर्दशी संपताच आज तळीरामांनी बारची वाट धरली.