पावसाळ्यात मधुमेहींनी तब्येतीची काळजी घेणे फार आवश्यक आहे. ज्यामुळे वाढत्या आर्द्रतेमुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
मान्सूनमध्ये आर्द्र व पावसाळी वातावरणाचा रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. हवामानातील अचानक बदलामुळे इन्सुलिन संवेदनशीलतेमध्ये चढ-उतार होऊ शकतात. उच्च आर्द्रतेमुळे मधुमेह असलेल्या काही व्यक्तींच्या इन्सुलिन प्रतिरोधशक्तीमध्ये वाढ होऊ शकते. याचा अर्थ असा की त्यांचे शरीर ते घेणारे औषधोपचार किंवा इन्सुलिनला प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकत नाही.
मधुमेह असलेल्या व्यक्तींना संसर्ग व आजारांचा वाढता धोका:
– पावसाळ्यामध्ये वातावरण आर्द्र होण्यासोबत पाणी साचते, जे जीवाणू व बुरशीची वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींना इंटरट्रिगो फंगल इन्फेक्शन व जीवाणू संसर्ग यासारखे संसर्ग होण्याचा धोका असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. डायबेटिस फूट समस्यांमध्ये देखील वाढ होऊ शकते.
– मधुमेह असलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती रक्तातील शर्करेच्या पातळ्यांमधील चढ-उतारामुळे कमी होते. यामुळे त्यांचे शरीर रोगजंतूंचा प्रतिकार करू शकत नाही, परिणामत: आजार होऊ शकतात. इतरांसाठी सहजपणे बऱ्या होऊ शकणाऱ्या लहान जखमा किंवा खरचटणे समस्या निर्माण करू शकतात.
– याव्यतिरिक्त, रक्तातील शर्करेच्या उच्च पातळ्यांमुळे त्वचा जाड होत पायामध्ये लहान भेगा पडू शकतात. या लहान भेगांमुळे डायबेटिक फूट अल्सर्स सारखे संसर्ग होऊ शकतात. लहान रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजमुळे रक्ताभिसरण कमी होते, ज्यामुळे उपचार प्रक्रिया मोठ्या प्रमाणात मंदावते.
मुसळधार पावसादरम्यान औषधांचा साठा व पुरवठ्याची हाताळणी:
– मुसळधार पावसामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना औषधोपचार व्यवस्थापनासंदर्भात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. मुसळधार पावसासह पूरग्रस्त स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे तुमचे इन्सुलिन आणि इतर औषधांचा सुरक्षितपणे साठा करणे आवश्यक आहे. पावसाळा येण्यापूर्वी नियमितपणे पुरवठा तपासून घ्या. मुसळधार पावसादरम्यान किंवा पूरग्रस्त स्थितींमध्ये फार्मसीमध्ये जाणे अवघड होते, म्हणून अशावेळी औषधांचा मुबलक पुरवठा करून ठेवा.
– वॉटरप्रूफ स्टोरेज कंटेनर्स खरेदी करा. हे पाण्यापासून संरक्षण करण्यासोबत आर्द्रतेमधील चढ-उतारादरम्यान इन्सुलेशन देखील देते. वीजपुरवठा खंडित झाल्यास आइस पॅक्स असलेले लहान पोर्टेबल कूलर स्थिती सानुकूल ठेवण्यास मदत करू शकते.
– प्रतिकूल हवामानामुळे नियमित आहार किंवा औषधोपचार मिळणे अवघड असल्यास इमर्जन्सी किट तयार ठेवा, ज्यामध्ये बॅकअप पुरवठ्यांसह स्नॅक्स आणि ग्लुकोज टॅब्लेट्स ठेवावे. अशा स्थितींमध्ये सक्रिय राहिल्याने अनपेक्षित वातावरणापासून तुमच्या आरोग्याचे संरक्षण होण्यासोबत मन:शांती मिळेल.
पावसाळ्यादरम्यान मधुमेह असलेल्या व्यक्तींना आरोग्यदायी राहण्यासाठी टिप्स
• पावसाळ्यादरम्यान आरोग्यदायी राहण्यासाठी सक्रिय राहणे आवश्यक आहे. प्रथम म्हणजे, वारंवार रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर देखरेख ठेवा. तुमचे शरीर इन्सुलिनला देणाऱ्या प्रतिसादावर आर्द्रतेचा परिणाम होऊ शकतो.
• पायाची स्वच्छता राखण्याला प्राधान्य द्या. आर्द्र स्थितींमध्ये होऊ शकणारे फंगल संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी पाय कोरडे व स्वच्छ ठेवा. ओलावा निर्माण न होण्यासाठी हवेशीर फूटवेअरची निवड करा. पायाची समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
• आहार नियोजन देखील महत्त्वाचे आहे. कमी कर्बोदके असलेल्या आहाराचे सेवन करा, ज्यामुळे रक्तातील शर्करेच्या पातळ्या स्थिर राहण्यास मदत होईल, तसेच रस्त्यावरील पदार्थ सेवन करणे टाळा, जे पावसारम्यान सुरक्षित नाहीत.
• हायड्रेटेड राहा, पण किडनीच्या समस्या असल्यास पाणी पिण्याच्या प्रमाणावर देखरेख ठेवा. साखरयुक्त पेयांऐवजी पाणी उकळून प्या किंवा हर्बल चहा प्या.
• व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका! पावसामुळे बाहेरील क्रियाकलापांवर बंधन असल्यास योगा किंवा रेसिस्टण्स ट्रेनिंग सारखे घरगुती व्यायाम प्रभावी ठरू शकतात.
स्वत:ची काळजी घेण्याला प्राधान्य देण्यासह आणि अनपेक्षित बदलांसाठी सज्ज राहण्यासह मुसळधार पावसामुळे किंवा पूरग्रस्त स्थितींमुळे येऊ शकणाऱ्या अडथळ्यांवर मात करत परिपूर्ण जीवन जगता येते.
(लेखक: डॉ. व्ही. मोहन – अध्यक्ष व चीफ डायबेटोलॉजिस्ट, डॉ. मोहन्स डायबेटिस स्पेशालिटीज सेंटर आणि श्रीमती उमाशक्ती डायटेशियन डॉ. मोहन्स डायबेटिस स्पेशालिटीज सेंटर)