शाहरुखच्या ‘झीरो’ चित्रपटाविरोधात हायकोर्टात याचिका,सोमवारी सुनावणी

22

सामना ऑनलाईन मुंबई

चित्रपटात किरपन वापरून शीख बांधवांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘झीरो’ चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

शाहरुख खानचा ‘झीरो’ चित्रपट त्याच्या वेगळ्या विषयामुळे सुरुवातीपासूनच प्रसिद्धीच्या झोतात आहे. यात शाहरुख एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत असून चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात व्हिज्युअल इफेक्टस्चा वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर व पोस्टर 3 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाले असून चित्रपटात शीख बांधवांकडील पवित्र किरपन अपमानकारक पद्धतीने वापरण्यात आले आहे. त्यामुळे शीख बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याने या प्रकरणी दिल्ली येथे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. चित्रपटातील ही दृश्ये वगळण्यात यावीत यासाठी ऍड अमरीतपाल सिंग खालसा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर हायकोर्टाच्या सुट्टीकालीन खंडपीठाकडे सोमवारी सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या