Petrol Price hike – महागाईच्या आगीत तेल! कच्च्या तेलाचे भाव $105 वर; पेट्रोलचे वाढले दर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील ( Iran Israel USA War) संघर्ष आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचला असून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यात शस्त्रसंधीची शक्यता धूसर झाली आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी कच्च्या तेलाच्या आणि माल वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असली तरी ती संख्या पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काळ लागणार आहे. LPG गॅस पाठोपाठ जनतेला आता पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीला सामोरे जावे लागणार आहे.

युद्ध परिस्थितीचा परिणाम हिंदुस्थानसारख्या आशियायी देशांवर झाला असून गेल्या दोन आठवड्यात LPG गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच व्यावसायिक LPG सिलिंडर अजूनही मागणीच्या तुलनेत कमीच मिळत आहेत. त्यामुळे छोटे उद्योग, काही हॉटेल व्यावसायिक यांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी १६ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्याचा परिणाम हिंदुस्थानच्या काही राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

बाजाराची सुरुवात होताच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत २ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत आता $१०५.१५ प्रति बॅरल इतकी झाली आहे. तर WTI कच्च्या तेलाच्या किमतीत $१.६१ ची वाढ झाली असून ते $१००.३२ प्रति बॅरलवर पोहोचले आहे. हिंदुस्थानच्या मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलचे दर स्थिर ठेवण्यात आले असले तरी प्रमुख राज्यांमध्ये मात्र दर वाढल्याचे पाहायला मिळत असल्याचे एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.

कोणत्या राज्यात पेट्रोलच्या दरात किती झाली वाढ?

महाराष्ट्रात ०.४२ पैसे वाढून १०४.६४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

गुजरातमध्ये पेट्रोल ०.७३ पैसे वाढून ९५.२७ रुपये प्रति लिटर झाले आहे.

उत्तराखंडमध्ये ०.९० पैसे वाढून ९३.६४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

गोव्यात ०.६४ पैसे वाढून ९६.९६ रुपये प्रति लिटर झाले आहे.

आंध्र प्रदेशात ०.५३ पैसे वाढून १०९.५७ रुपये झाले आहे.

पश्चिम बंगाल मध्ये पेट्रोल ०.४२ पैसे वाढून १०६.६४ रुपये प्रति लिटर वर पोहोचले आहे.