सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पेट्रोल व डीजेल च्या वाढत्या किमतींपासून सामान्य माणसाची आता सध्या तरी सुटका झाली आहे. कारण इंधनाच्या किंमतीत घट झाली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याचा परिणाम हिंदुस्थानी बाजारावर झाला. सलग चौथ्या दिवशी पेट्रोल व डीजेलच्या किमतीत घट झाली आहे. इंडियन ऑईलने रविवारी पेट्रोल व डीजेलच्या किमतीत 12 रुपये 20 पैश्यांची घट केली आहे. तीन दिवसांत पेट्रोल 36 तर डीजेल 53 पैशांनी स्वस्त झाले आहे. तसेच दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीमध्ये 12 पैशांची घट झाल्याने त्याची किंमत 71रुपये 50 पैसे इतकी झाली आहे. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 77 रुपये 16 पैसे कोलकात्यात 73 रुपये 62 पैसे, चेन्नईत 74.27 रुपए प्रतिलीटर पेट्रोल मिळत आहे.
तर डीजेल किंमतीमध्ये 20 पैशांची घट झाली असून आता दिल्ली मध्ये 66.16 रुपये प्रतिलीटर मिळत आहे. तर मुंबईमध्ये 69.38 रुपये ,चेन्नईमध्ये 69.99 रुपये ,कोलकत्ता 68.05 रुपये प्रतिलीटर डिझेल मिळत आहे.


























































