VIDEO: अरेच्चा! बोरवेलमधून चक्क पेट्रोल ..?

सामना ऑनलाईन । पिंपरी चिंचवड

दिवसेंदिवस पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ होत असताना चिंचवडमध्ये एका बोरवेलमधून पाण्याएवजी चक्क पेट्रोल येत असल्याने नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय बनला आहे. मोशी-आळंदी रस्त्यावरील डुडुळगावामधील तळेकर नगरमध्ये एका बोअरवेलमध्यून हे पेट्रोल मिश्रीत पाणी येत आहे. बाजूला असलेल्या पेट्रोल पंपाच्या भूमिगत टाकीमधून पेट्रोलची गळती होऊन ते पेट्रोल बोअरिंगच्या पाण्यात मिसळले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे  कुतूहलापोटी येथे नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे.

तळेकर नगरमध्ये पेट्रोल पंपमध्ये पेट्रोलचा साठा करण्यासाठी असलेली भुमिगत टाकीमध्ये गळती होत असल्यामुळे शेज़ारील बोरवेलमधील पाण्यात तसेच शेतात सुद्धा पेट्रोल मिश्रित पाणी शिरले असावे, असा येथील नागरीकांचा अंदाज आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे पण नुकसानही झाले आहे.