एटीएम आणि यूपीआयमधून काढता येणार पीएफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्मचारी भविष्य निधी संघटन लवकरच आपली सिस्टम अपग्रेड करून ईपीएफओ 3.0 आणण्याची तयारी करत आहे. ही सुविधा आल्यानंतर पीएफ सदस्यांना एटीएम आणि यूपीआयमधून पीएफचे पैसे काढता येतील. सध्या पीएफ काढण्यासाठी मोठी आणि किचकट प्रक्रिया आहे. यात अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. कंपनीची मंजुरी आणि अनेक दिवसांची वाट पाहावी लागते. परंतु ईपीएफओ 3.0 सिस्टम लागू झाल्यानंतर डिजिटल पद्धतीने कोर बँकिंग सिस्टम तयार केली जाईल. यामुळे पीएफ बॅलन्स तत्काळ चेक करणे, ऑनलाईन क्लेम करता येईल तसेच लवकर पैसे काढता येतील. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे पीएफचे पैसे आता एटीएम किंवा यूपीआयमधून काढता येऊ शकतील. परंतु ही सुविधा रुग्णालयातील उपचार, घर खरेदी, शिक्षण यासारख्या कामासाठी असेल. यांसंबंधीचे नियम ईपीएफकडून लागू होतील. नोकरी बदलल्यानंतर पीएफ ट्रान्सफर सुद्धा आपोआप होईल.