बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे कधी तिच्या अभिनयामुळे तर कधी नेपोटीझम या विषयामुळे कायम चर्चेत असते. मात्र सध्या चर्चा आहे ती तिच्या हटके लूकची. अलीकडेच तिने लॅक्मे फॅशन वीकमध्ये ‘हाऊस ऑफ लॅक्मे’ च्या ग्रँड फिनालेमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिच्या नव्या लूकने सागळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
यादरम्यान अनन्याने प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलने यांनी डिझाइन केलेल्या सुंदर लेहेंग्यामध्ये शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर वॉक केला.
यावेळी अनन्याने काळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यावर तिने स्टॅण्ड कॉलर जॅकेट स्टाईलचा ब्लाऊज देखील परिधान केला आहे. तसेच तिच्या लेहेंग्यावर लाल रंगाची गुलाबाच्या फुलांचीही डिझाईन केली आहे.
रेशीम मखमलीपासून बनवलेल्या ए-लाइन स्कर्टवर मोठ्या आकाराच्या लाल गुलाबांची डिझाईन आहे. यासोबतच हरीण, पक्षी इत्यादींचे प्रिंट्सही लेहेंग्यावर दिसत आहेत.
हा लूक पूर्ण करण्यासाठी अनन्याने कानात गोल आकाराचे ईअरिंग्स घातले असून हातात सोनेरी ब्रेसलेट घातले आहे. अनन्याने आय मेकअप आणि ड्रेससोबत लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे. त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.