Photo – पाकिस्तानशी क्रिकेट नकोच! महिला आघाडीची उग्र निदर्शने

मोदी सरकारने पाकिस्तानशी क्रिकेटचा डाव मांडला असला तरी देशवासीयांची भावना नेमकी त्याविरोधात आहे. याची प्रचीती आज आली. पाकिस्तानशी क्रिकेट नकोच असे म्हणत राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला रस्त्यावर उतरल्या. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर सर्वच ठिकाणी शिवसेनेच्या महिला आघाडीने सर्वसामान्य गृहिणींनी उग्र निदर्शने केली आणि मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

खणानारळाची ओटी पाठवली

शिवसेना विभाग क्रमांक 11च्या वतीने शिवसेना भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुंकू, सौभाग्याची ओटी व सिंदूर दिल्लीत पाठवण्यासाठी खासदार अनिल देसाई यांच्याकडे देण्यात आले. या वेळी सचिव साईनाथ दुर्गे, उपनेत्या किशोरी पेडणेकर, दिनेश बोभाटे, राकेश देशमुख, अनुपमा परब, विनिता चव्हाण व माई आरोलकर उपस्थित होत्या.

 

विक्रोळीत निदर्शने

हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याविरोधात  विक्रोळी येथे शिवसेना ईशान्य मुंबई विभागाच्या वतीने ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी आमदार सुनील राऊत, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, महिला विभाग संघटिका रश्मी पहुडकर, हेमलता सुकाळे व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 

 

दुबईतही पडसाद, स्टेडियम अर्धे रिकामे

हिंदुस्थान- पाकिस्तान क्रिकेट सामन्याला देशभरातून तीक्र किरोध झाला. राष्ट्रभक्त जनतेने सामन्याकर बहिष्कार टाकला. त्याचे पडसाद दुबईच्या स्टेडियमकरही पाहायला मिळाले. एरक्ही हिंदुस्थान-पाकिस्तान सामना म्हटला की तिकिटींकर उडय़ा पडतात. मात्र, आज केगळे चित्र दिसले. दुबईचे अर्धे स्टेडियम रिकामे होते. सामन्याकडे राष्ट्रभक्त प्रेक्षकांनी पाठ फिरकली.

 

शिवसेना भवन

दादर येथील शिवसेना भवनात झालेल्या आंदोलनात शिवसेनेच्या रणरागिणींनी भाजप पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणा दिल्या. आंदोलनात शिवसेना नेते, सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिवआमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभागसंघटक, माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, रंजना नेवाळकर, आरती किनरे, रेखा देवकर, माधुरी मांजरेकर, दीपाली साने, सुरेश काळे, नितीन पेडणेकर यांच्यासह अन्य पदाधिकारीशिवसैनिक सहभागी झाले होते.

 

नागपुरात निषेध

मोदी सरकारचा आज नागपूरच्या महिला शिवसैनिकांनी एकत्र येत माझं कुंकू, माझा देश अभियान राबवून तीव्र निषेध केला. जय शहा मुर्दाबाद, नही चलेंगी नही चलेंगी बीसीसीआय की नही चलेंगी, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. नागपूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सतीश हरडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख किशोर  कुमेरिया, प्रमोद मानमोड यांच्या सहयोगाने संपर्क संघटिका डॉ. अंजुषा बोधनकर आणि जिल्हा संघटिका सुरेखा खोब्रागडे व सुशीला नायक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

 

वडोदरा

कडोदरा येथे शिकसेनेने तीक्र निदर्शने केली. गुजरात राज्य सहसंपर्क प्रमुख केतन त्रिकेदी, राज्य प्रमुख दीपक खरसीकर यांच्यासह दीपक पालकर, तेजस ब्रम्हभट्ट, चेतन कळंबे, तालिब दकाकाला, रश्मी साळगाककर, अनिता मिस्त्राr, यज्ञेश सूर्यकंशी, प्रतीक दिगाककर सहभागी झाले होते.

 

गिरगावात टीव्ही फोडून निषेध

पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱया केंद्र सरकारविरोधात गिरगाव येथे शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 महिला आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी प्रतीकात्मक स्वरूपात टीव्ही फोडून पाकिस्तानविरुद्ध तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही निषेध नोंदवण्यात आला. त्या वेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, अशोक धात्रक, शिवसेना उपनेते, सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार अरविंद नेरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे तसेच महिला आघाडी विधानसभा प्रमुख अरुंधती दुधवडकर, गायत्री आवळेगावकर, पल्लवी सपकाळ, माजी नगरसेविका विशाखा पेडणेकर, युवती सेना अधिकारी पायल ठाकूर, शुभदा कोळी व शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

 

शीव कोळीवाडा

शिवसेना विभाग क्रमांक 9च्या महिला आघाडीच्या वतीने ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, प्रणिता वाघधरे, माजी नगरसेविका निधी शिंदे, स्मिता गांवकर, सुलभा पत्याने, विधानसभा संघटक प्रीतम निंबाळकर, सुहासिनी ठाकूर, विनयना सावंत, नीलम डोळस, शारदा गोळे, महिला शाखा संघटक वासंती दगडे, छाया एलिगट्टी, जना नेलगे, अनिता पवार, स्वरा कदम, सुचिता कोळंबेकर, पूजा कस्पाले, गजानन पाटील, आनंद जाधव, महेंद्र नाकटे, निमिष भोसले, प्रभाकर भोगले, दत्ता भोसले, राजेश कुचिक, शिवाजी गावडे, विनायक तांडेल, संजय म्हात्रे, विनोद मोरे, नितीन पोटले, संजय कदम, प्रशांत जाधव, सचिन खेडेकर, प्रकाश हसबे, समाधान जुगदर,  ऋषी नेलगे व शिवसैनिक उपस्थित होते.

रत्नागिरी

रत्नागिरी शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, नितीन तळेकर, उपजिल्हा संघटक ममता जोशी, विधानसभा महिला संघटक सायली पवार, महिला आघाडीच्या पूजा जाधव, विधानसभा क्षेत्र संघटक सायली पवार, उपशहर संघटक सेजल बोराटे, माजी नगरसेविका रशीदा गोदड, माजी नगरसेविका राजश्री शिवलकर, उन्नती कोळेकर, विजया घुडे, पूजा जाधव, मेघा मोहिते, सुवर्णा शिरधणकर, संगीता मयेकर, ज्योती मोरे, शुभ्रा बोरकर आदी उपस्थित होते.

 

विलेपार्ले

शिवसेना विभाग क्र. 1 महिला आघाडीतर्फे ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे, माजी नगरसेवक सुजाता पाटेकर, योगेश भोईर, विधानसभा प्रमुख शरयू भोसले, रेखा बोराडे, उपविभाग संघटक वंदना खाडये, रोशनी गायकवाड, अमिता सावंत, उषा कोरगावकर, अश्विनी सावंत, जयश्री बंगेरा, सिमिंतीनी नारकर, स्नेहल पालांडे, अशोक म्हामुणकर, बाळकृष्ण ढमाले, संजय भोसले, सिनेट सदस्य मिलिंद साटम, शशिकांत झोरे, अशोक सोनावणे, उत्तम बारबोले, दिलीप नागरे, स्नेहा कोतकर अणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

विलेपार्ले

शिवसेना विभाग क्रमांक 5च्या वतीने शिवसेना नेते, ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली विलेपार्ले येथे ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन करण्यात आले. शिवसेना महिला आघाडी रजनी मेस्त्राr, महिला पदाधिकारी व युवासैनिक, शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. या वेळी कुंकू व बांगडय़ा एकत्र करून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. त्याचप्रमाणे विलेपार्ल्यातील सर्व हॉटेल व बार मालकांना भेट देत टीव्हीवर हिंदुस्थान-पाकिस्तान सामना दाखवू नये, अशी विनंती करण्यात आली. याप्रसंगी विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, शाखाप्रमुख प्रकाश सपकाळ, अनिल मालप, युवासेना सचिव आनंद पाठक,  अमित जोशी, हरीश माईन व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर महिला आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्यासह महिला पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.

घाटकोपर

विभाग क्र. 8च्या वतीने विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) पाटील, महिला विभागसंघटिका प्रज्ञा सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौभाग्याची लेणी, कुंकू व बांगडय़ा पाठवून निषेध नोंदविण्यात आला.

अशा माणसाला कुंकवाची काय कदर?

हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याच्या विरोधातला राग महिलांनी पंतप्रधान मोदींवर काढला. ‘पहलगामच्या हल्ल्यात अवघी चार दिवसांची विवाहित महिला विधवा झाली. याची त्यांना लाज वाटली पाहिजे. पण आपल्या पंतप्रधानांना ती वाटणार नाही. कारण त्यांना स्वतःची बायको सांभाळता आली नाही. आईला सांभाळता आलं नाही. आईला भावानं सांभाळलं. यांनी फक्त आईचे पाय धुऊन पूजा करण्याची नौटंकी केली. अशा माणसाला कुंकवाची काय कदर असणार,’ असा संताप एका शिवसैनिक महिलेने व्यक्त केला.