
नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला 4-3 गुणफरकाने पराभूत करत 68व्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची मानाची चांदीची गदा जिंकली. आता तो यापुढे ‘डबल महाराष्ट्र केसरी’ म्हणून मिरवणार आहे.
(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)

हर्षवर्धनने याआधी 2019 साली पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा उंचावली होती. आता ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होताच हर्षवर्धनच्या पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला.

त्याला मानाची चांदीची गदा, फॉर्च्युनर गाडी व रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले

दुसऱयांदा ‘उपमहाराष्ट्र केसरी’ किताबावर समाधान मानावे लागलेल्या महेंद्र गायकवाडला स्कॉर्पिओs गाडी व रोख चार लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.



























































